उपक्रम (Activities)

प्रमाणपत्र कोर्स :

          विभागामार्फत समाजकार्य शिक्षण हा प्रमाणपत्र कोर्स आजीवन विभाग शिवाजी विद्यापीठ यांच्यामार्फत सुरू करण्यात आला आहे.

राष्ट्रीय चर्चासत्र :

         समाजशास्त्र विभागाने 23 जानेवारी 2014 रोजी मराठी मानसशास्त्र विभागा सोबत  राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. राष्ट्रीय चर्चासत्राचा विषय 'Tribal Society: Literature, Society and Psychographic relationship' असा होता. या कार्यक्रमासाठी बीजभाषक म्हणून सौ. माहेश्वरी गावीत होत्या. तसेच श्री. वाहरू सोनवणे डॉ. जगन कराडे हे साधन व्यक्ति म्हणून लाभले होते.

वेबिनार:

         कोव्हिड-19 महामारीचे संकट डोळ्यासमोर ठेवून समाजशास्त्र विभागाने 'Impact of Covid-19 on Social Relationship’ या विषयावर दि. 18 ऑक्टोबर 2020 रोजी वेबिनारचे आयोजन केले होते. सदरच्या कार्यक्रमासाठी बीज भाषक म्हणून डॉ. दिवाकर सिंह रजपूत, माजी समाजशास्त्र समाजकार्य विभाग प्रमुख, डॉ. एच. एस. गौर युनिवर्सिटी सागर, मध्यप्रदेश हे होते. तसेच डॉ. सतीश  देसाई, समाजशास्त्र विभाग प्रमुख, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालय, मिरज हे साधन व्यक्ति म्हणून लाभले होते.

व्याख्यान :

         डॉ. नवनाथ शिंदे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, आजरा महाविद्यालय आजरा यांचे मी शाहू महाराजांशी बोलतोयया विषयावर विद्यार्थ्याना समाजपरिवर्तनामध्ये शाहू महाराजांचे योगदान समजावे ह्याविषयी एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले होते. तसेच ग्रामीण समाजातील बदलते स्वरूप या विषयावर डॉ. मधुकर धुतुरे, समाजशास्त्र विभाग प्रमुख, विठ्ठलराव पाटील महाविद्यालय, कळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सामंजस्य करार :

         विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी, नवनवीन संशोधनाची माहिती मिळावी तसेच विषमाची आवड निर्माण व्हावी मासाठी विभागाने मराठी समाजशास्त्रीय परिषदयांच्याशी दि. 30 जानेवारी 2019 रोजी सामंजस्य करार केला आहे.

अभ्यास भेट :

         विद्यार्थ्यांना सामाजिक वास्तव याची जाणीव व्हावी म्हणून तळसदे  गावातील गोपाल समाजाचा अभ्यास सर्वे पद्धतीने करण्यात आला. तसेच गोकुळ दूध संघ, अभ्यंकर फूटवेअर या ठिकाणी अभ्यास भेट देण्यात आली. अनाथ निराधार लोकांना 26 जानेवारी या दिवशी गोड पदार्थांचे वाटप करण्यात आले.

भित्तिपत्रक :

         विभागातील विधार्थ्याना समाजातील समस्या, समाज रचना तसेच सामाजिक परिवर्तन या विषयी माहिती होण्यासाठी दरवर्षी भीत्तिपत्रके तयार करण्यात येतात. 

No comments:

Post a Comment